दि. 24 जानेवारी रोजी दीपलक्ष्मी नागरी पतसंस्था, सातारा येथे कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.बचतीतून मदत ही संकल्पना मुळाशी धरून समुहाचा "शैक्षणिक आर्थिक मदत वाटप" हा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमात वेगळेपण यावे यासाठी सामाजिक कार्यात योगदान असलेल्या एल. बी. एस महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विषयाचे निवृत्त प्राध्यापक मा. एन. व्ही. शिंदे सर यांना आमंत्रित करण्यात आले होते. समाजासाठी एक रुपया देण्याची मानसिकता अंतर्मनातून यायला यावी, इतरांचे अनुकरण करण्यापेक्षा स्वतःच्या आत डोकावून पाहणे महत्वाचे, जगण्याचे काहीतरी ध्येय असावे. ही संकल्पना खूप उत्कृष्ठ असून त्याचे वाटेकरी होणे खूप चांगली गोष्ट आहे हे त्यांनी आपल्या वक्तव्यातून सांगितले.
मदतीसाठी एकूण 9 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे व आर्थिक बाबी तपासून, पालकांना कल्पना देऊन मदत पाहुण्यांच्या, समूह सदस्य व प्रतिनिधी यांच्या हस्ते देण्यात आली. मदत घेतलेल्या व्यक्तींनी त्यांचे मनोगत व्यक्त करून देऊ केलेल्या मदतीचा योग्य वापर करू असे सांगितले. यावेळी एकूण रक्कम 63,300 वितरित केली असून उर्वरित जून मध्ये राबवण्यात येणाऱ्या नवीन संकल्पनांसाठी शिल्लक ठेवण्यात आली आहे.
मार्गदर्शक मा. प्रा. शेलार सर यांनी भविष्यात समूहाला मोठे करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असून येणाऱ्या काळात समूह वाढत असताना सदस्यांची जबाबदारी स्पष्ट केली. या समूहात येणाऱ्या काळात फिरते ग्रंथालय, शैक्षणिक दत्तक, शैक्षणिक साहित्य वाटप या नवीन संकल्पना राबवण्याचा विचार चालू असल्याचे त्यांनी सांगितले. सदस्य म्हणून विद्यार्थिनीने समुहाविषयी प्रांजळ साभार प्रकट केले.
कार्यक्रम झाल्यावर सदस्य वेगवेगळ्या क्षेत्रात भवितव्य घडवत आहेत तरी एकमेकांचा आपल्याला परिचय व्हावा व मार्गदर्शनासाठी उपयोग व्हावा या हेतूने चर्चा करण्यात आली. कार्यक्रमासाठी एकूण 50-60 सदस्य उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन सर्व समूह प्रतिनिधींनी केले असून सूत्रसंचालन मयुरी खानविलकर, प्रास्ताविक सारिका माने, पाहुण्यांचा परिचय राजश्री घोडके व आभारप्रदर्शन अक्षय सपकाळ यांनी केले.
6. संपदा चव्हाण
नमस्कार, माझे नाव कु . संपदा वसंत चव्हाण आहे . सध्या शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे M.SC. (physics) या विषयातून माझे post graduation complete करत आहे.मी आपल्या "Helping hands या ग्रुपमध्ये 2021 ला join झाले या ग्रुपची माहीती शेलार सरांनी सांगितली होती. संकल्पना तर खूपच छान होती, परंतु सगळ्यांना झेपेल अशीही होती, स्वबचतीतून दिवसातला फक्त एक रुपया आणि अशाप्रकारे वर्षाचे 365 रु. जमा करायचे. आणि बचतीतून गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदत कार करायची.
आपली इच्छा असते की, समोरच्याला मदत करायची पण आपण एकटे तेवढे capable नसतो की, एखादयाला मदत करू शकू , पण या ग्रुपच्या माध्यमातून आपण कोणाची तरी मदत करू शकतो. या group मध्ये सहभागी झाल्याचा खरं तर खूप आनंद होतो, ग्रुपमध्ये join झाले तेव्हा कोणाला तरी आपण शिक्षणासाठी मदत करू शकतो. आज या ग्रुपमुळे मी स्वतःला पण मदत केली. स्वतः च्या उच्च शिक्षणासाठी या ग्रुपमधून मदत घेतली. मी या मदतीचे नक्की सोने करेन व माझ्या शिक्षणासाठी सदुपयोग करेन.
मी शेलार सर व ग्रुपमधील सर्व सदस्यांची खूप-खूप आभारी राहीन की त्यांनी मला मदत देण्यास योग्य समजले मी माझी या ग्रुप बद्दलची असणारी बांधिलकी कायम जपेन आणि या ग्रुपची कायम कृतज्ञ राहीन. Thank you ...
7. सिद्धी घोरपडे
मी कु घोरपडे सिद्धी सयाजी मला हेलपिंग हॅन्ड मधून हेल्प केल्याबद्दल सर्वांचे आभार मानते .मी बाहेर असल्यामुळे मला मिट्टीन्ग ऑफलाईन अटेंड करता आल्या नाहीत .२४ जानेवारी ला प्रथमच ऑफलाईन अटेंड केली ,पण एक्सपेरिन्स खूपच मस्त होता सगळ्यांशी भेटून खूप छान वाटल . तसेच Admin म्हणून काम करताना specially आपल्या ग्रुप मधील मेंबर ला हेल्प साठी जेव्हा कॉन्टॅक्ट करायचा होता तो अनुभव Excelent hota . मेंबर कडून मिळणार रिस्पेक्ट आणि त्यांच्या अशा positive रिप्लाय मुले अजून काम करण्यास motiviation मिळत आहे
हेलपिंग हँड म्हणजे मदतीचे हात जे की शैक्षणिक प्रवाहापासून बाहेर राहिलेल्या विद्यार्थ्यांना एक हातभार लावण्याचे काम करत आहे. या ग्रुपमध्ये काम करताना मी एक व्यक्ती म्हणून माझ्यामध्ये सामाजिक दृष्टिकोन विकसित होत आहे तसेच जेव्हा एडमिन सोबत काम करावे लागते तेव्हा आपल्या ग्रुप साठी काय करता येईल आपल्या ग्रुपला कसे मोठे करता येईल याचा विचार करताना खूप छान वाटत आहे. या ग्रुपने प्रत्येकाला आपलंसं करून घेतले आहे. वेगवेगळ्या भागातून मुले जोडले गेले आहेत परंतु वेळातला वेळ देऊन सर्वजण या ग्रुपला मोठे करण्याचे काम करत आहेत. स्टेज वरती बोलताना माझ्यामध्ये संवाद कौशल्य व सादरीकरण कौशल्य निर्माण होत आहे. आपण कोणत्या ग्रुपला जोडले गेले आहोत ते प्रत्येकाच्या इच्छेनुसार ,आवडीनुसार असते परंतु सामाजिक कार्य करणाऱ्या ग्रुपमध्ये आपण कितपत जोडले आहोत हे एक व्यक्ती म्हणून आपली प्रतिमा दर्शवते. मला आनंद होत आहे मी हेल्पिंग हँड या समूहाची एक सदस्य आहे. संकल्पना जर चांगली असेल तर ती प्रत्यक्ष आकारताना खूपच आनंद होतो. समूहामध्ये काम करताना जास्त फार वेळ न देता, माझे clg सांभाळून मोजक्या मीटिंग चे नियोजन करण्यासाठी व आपल्या ग्रुपच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी वेळ द्यावा लागतो. त्यात काम करताना एकमेकांचे विचार ऐकून घेणे, समजून घेणे आपले विचार आपल्या काही कल्पना आपण सुचवणे हे शिकायला मिळत आहे. आपला समूह वृद्धिंगत होवो हीच इच्छा आहे. सर्वांना खूप खूप धन्यवाद.
8. अवंतिका बिबवे
नमस्कार मी अवंतिका बिबवे, हेल्पिंग हँडसची संकल्पना गरजू विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. मला शिक्षणासाठी पैशांची गरज होती खूप प्रॉब्लेम होते घरी आणि कॉलेज मध्ये एक्झाम फॉर्म सबमिट करून घेत नव्हते कळत नव्हतं काय करू पण हेल्पिंग हँड्सच्या मुळे माझे शिक्षण चालू आहे. मी खूप आभारी आहे हेल्पिंग हँडसची! थँक्यू आणि आपण सर्वांनी जर दिवसाला थोडी सेविंग केली तर आपल्यामुळे गरजू मुलांचे शिक्षण पूर्ण होईल जमलं तर नक्की थोडी थोडी जमेल तशी सेविंग करायला हवी.
धन्यवाद!
9. प्राजक्ता सावंत
मदतीचे हात हे एका छोट्या रोपट्याचे एका मोठ्या वटवृक्षात रूपांतर होत आहे हे पाहून मला खूप अभिमान वाटतो की मी या ग्रूप ची सदस्य आहे .थोडक्यात सांगायचं झाल तर आपल्याला जे काही मिळतंय ते अनेकांचं स्वप्न असत. आयुष्य जगत असताना आपण समाजाचं काही तरी देणं लागतं असतो कारण मदतीचा हात म्हणजे फक्त हात नसुन कोणा तरी एका विद्यार्थ्याच्या आयुष्याला कलाटणी किंवा एक महत्त्वपूर्ण वळण देणारा एक क्षण असतो. मला ही या ग्रूप मधून माझ्या भविष्याला कलाटणी देईल अशी आर्थिक मदत मिळाली आहे आणि मी याचा खुप चांगल्या रीतीने उपयोग करून यशस्वी होईल त्याचबरोबर मी सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देते. माझ्यावर विश्वास ठेऊन मला या मदतीसाठी पात्र ठरवलं मी कायम या ग्रुपची ऋणी राहील आणि ग्रूप साठी माझी जी काही जबाबदारी असेल ती मी योग्यरित्या पार पाडेल ग्रूपची खूप यशस्वीरित्या भरभराट होईल यासाठी मी कायम तत्पर राहील धन्यवाद 🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment