Meetings Year 2022- 23

HELPING HANDS Year 2022 Meetings:

पहिली कमिटी सभा 30  January , 2022

वार- रविवार      वेळ- 5-6

1. अॅडमीनने अॅड केलेल्या व्यक्तीपर्यंत गल्ला पोहचवणे...( व्यक्ती शक्य  असल्यास स्वतः सुद्धा गल्ला बनवू शकतो किंवा खरेदी करू शकतो. )

2.प्रत्येक सदस्यापर्यंत Helping Hands ची संकल्पना व्यवस्थित पोहचवणे. 

3. आपला समूह हा बचत करून मदत गोळा करण्यावर भर देतो.जे सभासद गेली दोन वर्षे मदत जमा करू शकले नाहीत अशा सदस्यांनी वैयक्तिक बचत करण्याचा प्रयत्न करावा.

    ज्यांनी दोन्हीही वर्षात रक्कम जमा केली नाही अशा सदस्यांना आणखी कालावधी देण्यात आला असून पुढील निर्णय कमिटी एकमताने घेईल.

4. संपूर्ण ग्रुपच्या वर्षभरात एकुण चार मीटिंग घेणे. 

5.सदस्यांना सुद्धा अॅडमीनच्या काही महत्त्वपूर्ण मीटिंग असतील तर त्यात सहभागी करून त्यांचे मत घेणे. 

6. रक्कम ज्यांनी घेतली आहे त्यांनी भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यानंतर केव्हाही इतरांना आपल्या सारखी मदत व्हावी ह्या हेतूने समूहात मदत परत करावी तसेच सक्षम होण्यापूर्वी मदत शक्य तशी समूहाला परत देता येईल का पहावे.

7.अॅड केलेले सदस्य, नाव, पत्ता, संपर्क इत्यादी शेलार सर या महिन्यापासून लिहिणार आहेत. 

8 सोशल मीडियावर ग्रुप दिसत आहे, सदस्यांना सुद्धा त्याबाबत कल्पना देऊन अधिकाधिक लोकांपर्यंत समूहाची संकल्पना पोहचवणे.

9. रक्कम जास्त जमा झाल्यास ज्याप्रमाणे शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यास एका वर्षाचा शैक्षणिक खर्च / अनाथ मुलास शैक्षणिक मदत देणे / इतर बाबींसाठी शैक्षणिक मदत तशाप्रकारे त्याचे नियोजन करणे.

  * दुसरी कमिटी सभा 6 May, 2022

  1. हेल्पिंग हँड्स मार्फत एक विद्यार्थी दत्तक घेणे.( दत्तक घेणे म्हणजे त्याचा शैक्षणिक खर्च सर्व ग्रूप मार्फत केला जाणार .जर मुलगा असेल तर त्याला बारावी पर्यंत मदत करायची आणि जर मुलगी असेल तर तिला degree पर्यंत मदत करायची.) 

2. ग्रूप मधील पहिली ते दहावी  पर्यंत च्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणे .

3.Commitee मेंबर ने आपले मेंबर्स वाढण्याचा प्रयत्न करावा . प्रत्येक कमिटी मेंबरने  वर्षभरात दहा मेंबर्स add करावेत .

4. कमिटी मेंबर्स ने आपण add केलेल्या मेंबर्स ना broadcast message through संपर्क साधावा .

5. येत्या जून पर्यंत सर्वांना गल्ले दिले जातील याची कमिटी मेंबर्स ने नोंद घ्यावी.

6. हेल्पिंग हँड्स च्या ग्रुप ची मिटिंग जून अखेर घेण्यात येईल.

7. हेल्पिंग हँड्स मार्फत ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी रक्कम परत करण्यासंदर्भात नियमावली तयार करावी.

8. ग्रुप मिटिंग ला जास्तीत जास्त सदस्य उपस्थित राहतील याची सर्व ॲडमिन यांनी नोंद घ्यावी.

9. ग्रुपची संख्या यावर्षी 300 च्या वर नेण्यास सर्व सदस्यांनी मदत करावी.

  

संपूर्ण समुहाची पहिली सभा June 19 June, 2022

💠 समुहाचा मुळ उद्देश आणि समुह कशासाठी काम करतोय ते सांगण्यात आले.

💠 समूहाची नियमावली आणि समुह वर्षभर कशाप्रकारे काम करतोय ते स्पष्ट करण्यात आले.

💠 Helping hands मधून काही विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करत होतो पण या वर्षापासून दोन नवीन संकल्पना राबवत आहोत त्याविषयी चर्चा करण्यात आली.

1. हेल्पिंग हँड्स मार्फत एक विद्यार्थी दत्तक घेऊन त्याचा शैक्षणिक खर्च 12 वी किंवा पदवी पर्यंत केला जाईल.

2. हेल्पिंग हँड्स मधील बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाईल.

💠 समूहात काही गोष्टींबाबत शंका होत्या त्यांचे समर्थन केले.

💠 सर्वांचा परिचय आणि थोडक्यात मनोगत घेतले गेले. 

 आपण ही मीटिंग खालील link वर सुद्धा पाहू शकता👇

https://youtu.be/cOxbhTCHhhk                            

  तिसरी कमिटी सभा 28 August, 2022 

1. आपल्या समूहात  230  सदस्य आहेत. सर्व सदस्यानी रक्कम द्यावी यासाठी Admin ने प्रयत्न करावा. 

2. एक विद्यार्थी दत्तक घेण्याचे नियोजन आपण यावर्षापासून करणार आहोत त्यासाठी वेगळे Account Admin open karel

3. November मध्ये होणाऱ्या Group meeting साठी जास्तीत जास्त प्रतिसाद मिळेल यासाठी प्रयत्न करणे

4. YouTube चे दोन व्हिडिओ बनवणे.

 1) दत्तक संदर्भात 2) समूहातील  12 वी पर्यंत मुलांना शैक्षणिक साहित्य संदर्भात

5.  Notebook आणि Notebook sticker चे नियोजन दळवी मॅडम पाहतील

6. Helping Hands नावाने बरेच समूह असल्याने आपण एक टॅग line add karnar ahot... Save and Learn

7. ग्रुप chya 2 meetings आणि 24 जानेवारीच्या कार्यक्रमास चहा पाण्याची सोय करणे.

08. कार्यक्रम झाल्यावर फेब्रुवारी मध्ये पुढील वर्षाचे नियोजन करणे

09. सदस्याची एकमेकांना ओळख व्हावी यासाठी सहलीचे व वेगवेल्या उपक्रमाचे नियोजन करणे

Helping Hands( Save& Learn) शैक्षणिक दत्तक संदर्भात भेट ---दिनांक: 18/09/ 2022

यावर्षीपासून आपण Helping Hands या समुहाला एक नवीन फांदी जोडत आहोत. यावर्षीपासून आपण " *शैक्षणिक दत्तक "* ही नवी संकल्पना समुहात चालू करत आहोत. याच संदर्भात आलेल्या नावाप्रमाणे कमिटी मेंबर्स पालक आणि विद्यार्थी यांना भेटण्यासाठी गेले होते. या भेटीदरम्यान पालकांसोबत चर्चा करण्यात आली तसेच Helping Hands चा उद्देश स्पष्ट करण्यात आला. पालक व विद्यार्थी यांना मूळ कल्पना देऊन त्यांच्या सोबत पाल्याच्या भवितव्याविषयी चर्चा करण्यात आली. सदर भेटी दरम्यान Helping Hands चे कमिटी मेंबर्स उपस्थित होते. सदर भेटी या नुने आणि म्हाडा कॉलनी, सातारा येथे घेण्यात आल्या. इयत्ता दहावी आणि सातवी मधील विद्यार्थिनीची भेट घेण्यात आली. सर्व कल्पना देऊन त्यांची प्रतिकिया विचारण्यात आली. यासंदर्भात निर्णय कमिटी मार्फत घेण्यात येईल. Helping hands मार्फत शैक्षणिक मदत दिली जाईल व सोबतच पाल्याचे भविष्य कशाप्रकारे घडेल, समूहात वेगवेगळ्या स्तरातील शिक्षण घेणारे विद्यार्थी, उच्च शिक्षित आहेत तर त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्याला लाभेल. विद्यार्थी दत्तक घ्यायचा म्हणजेच त्याचा शैक्षणिक खर्च हा समूहात किती रक्कम जमा होईल तशा प्रकारे नियोजन करून साधारण पदवी पर्यंत करणे/ विद्यार्थी सक्षम होईल इतपत शैक्षणिक मदत करणे, शैक्षणिक साहित्य पुरवणे, वह्या - पुस्तके,कोर्स फी इत्यादी त्या विद्यार्थ्याला देणे याचे नियोजन केले गेले तसेच समुहाच्या मीटिंग मध्ये यावर सविस्तर चर्चा केली जाईल.

समूह आता मोठा होत आहे तरी येणाऱ्या काळात घेतली जाणारी रक्कम , त्याचा आढावा घेणे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती इत्यादींवर चर्चा करण्यात आली. एकूण आलेल्या नावांचा विचार करून सदर गोष्टी समूहाबाहेर जाऊन अपप्रचार होऊ नये याची जबाबदारी ही संपूर्ण समूहाची आहे ही गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. जानेवारी दरम्यान शैक्षणिक मदत दिल्यास जानेवारी ते जून दरम्यान क्लास अथवा एखादा course करण्यासाठी सुध्दा ही मदत उपयोगी पडू शकते. Helping hands द्वारे शक्य तेवढी मदत विद्यार्थ्याला करणे, विद्यार्थ्याने ती रक्कम पुन्हा समुहाला परत देणे या उद्दिष्टला समोर ठेऊन हा उपक्रम चालू होईल.


*चौथी कमिटी सभा---रविवार 27 नोव्हें, 2022* 

1. समुहातील सदस्यांचा संपर्क वाढावा यासाठी सहलीचे नियोजन करणे

2. समुहात जे सदस्य आहेत त्यांनी समुहाचा भाग म्हणून समूह कसा वाटला याविषयी मनोगतपर video बनवणे तसेच ज्या व्यक्तींना शैक्षणिक मदत मिळाली आहे त्यांनी आभार स्वरूप मनोगत व्यक्त करून इतर सदस्यांना मदत करण्यासाठी आवाहन करणे

3. सोशल मीडिया द्वारे समुह वाढवण्यासाठी समूहाच्या उद्देशाला धरून गरजू व्यक्ती आणि मदत करू पाहणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोहचणे

4. डिसें मध्ये संपूर्ण समूहाच्या सभेचे नियोजन

5.जाने 2023 च्या मुख्य सभेचे नियोजन


* रविवार, 11 डिसें , 2022 वार्षिक सभा

मुख्य संकल्पना *शैक्षणिक मदतीसाठी बचत* ही आहेच याबरोबरच २०२३ पासून आपण *शैक्षणिक दत्तक, वह्या वाटप* तसेच काही *मार्गदर्शनपर शिबीर* व *सहलींचे आयोजन* करणार आहोत. यामुळे आपल्या सदस्यांना वेगवेगळ्या विषयाचे मार्गदर्शन मिळेल आणि समुहाचे कुटुंबात रूपांतर होण्यास मदत होईल. नवीन उपक्रमासाठी ज्यांना ३६५ पेक्षा जास्त रक्कम मदत म्हणून देता येत असेल त्यांनी ती द्यावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून काहीजण या समूहामध्ये सहभागी होते परंतू अनेक जण आज पहिल्यांदा भेटले. सर्व नव्या जुन्या मित्र-मैत्रिणींना भेटून आनंद झाला तसेच एकमेकांच्या शिक्षण व व्यवसायाची देवाणघेवाण झाली. तरीसुद्धा जास्तीतजास्त सदस्यांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी अॕडमिन कडून करण्यात आले. यावेळी एक नवीन मुद्दा म्हणजेच कार्यक्रमाचे आयोजन हे Admin शिवाय इतर समूह सदस्य पण करू शकतात हे सांगण्यात आले.

शुक्रवार, 15 डिसेंबर, 2023 वार्षिक सर्वसाधारण सभा 

दिनांक 15 /12 /2023 रोजी हेल्पिंग हँड्स सेव्ह अँड लर्नची वार्षिक सर्वसाधारण सभा सातारा येथे पार पडली. या सभेसाठी समूहातील 25 विद्यार्थी उपस्थित होते. सभेची सुरुवात सर्व सदस्यांच्या ओळखीने झाली त्यानंतर राजश्री घोडके हिने ग्रुपची संकल्पना व कार्य सांगितले.दळवी मॅडम यांनी समूहात घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची  माहिती सांगितली. Moving library ची संकल्पना अक्षता माने हिने सांगितली.समूहातील शैक्षणिक दत्तक विद्यार्थिनी आरती व तिचे पालक हेही सभेस उपस्थित होते. वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली सभेमध्ये घेतलेले काही महत्वाचे निर्णय खालील प्रमाणे

1. 25 डिसेंबर ते 20 जानेवारी पर्यंत या वर्षाचा Helping हँड्सचा निधी गोळा केला जाईल. 

2.गरजू विद्यार्थ्यांची नावे 25 डिसेंबर ते 20 जानेवारी यादरम्यान घेतली जातील.

3. या वर्षीपासून 24 जानेवारीच्या जवळच्या रविवारी सदर कार्यक्रम घेतला जाईल म्हणजेच 28 जानेवारी 2024 ला मदत वाटपाचा कार्यक्रम होईल.

4. येणाऱ्या काळात मुविंग लायब्ररी ,पार्ट टाइम जॉब या उपक्रमासंदर्भात माहिती दिली जाईल व सर्व सदस्यांनी त्याचा लाभ घ्यावा.



No comments:

Post a Comment

लोकवर्गणी...# एक हात मदतीचा

31/ 12/ 2023 🤝"हेल्पिंग हँड्स समूहामार्फत"गावामध्ये मदत गोळा करण्यात आली तर यामध्ये लहान शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व गावा...