समूहाचे कामकाज व निवडीचे निकष

 ..कमिटीची कामे:-- 

1. नवीन सदस्यांना समूहात जोडणे

 2. नवीन सदस्यांची माहिती नोंदवणे 

3. ऑनलाईन/ ऑफलाईन मीटिंगचे आयोजन करणे 

4. सदस्यांकडून आलेल्या सूचनांवर चर्चा करून निर्णय घेणे  तसेच शंकानिरसन करणे

 5. गरजू व योग्य व्यक्तीची निवड करणे 

6. ग्रुपच्या उद्देशानुसार शैक्षणिक मदतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करणे

 7. समूहावर सर्व गोष्टींचा अहवाल सादर करणे

निवडीचे निकष:-

कमिटी मेंबर्सकडे ठरवल्याप्रमाणे निवडीचा संपूर्ण अधिकार आहे हे नियमावली मध्ये स्पष्ट केले आहे.

निवड करण्यासाठी काही निकष मीटिंगदरम्यान ठरवण्यात आले ते पुढीलप्रमाणे :

1. ज्या विद्यार्थ्यास मदत द्यावयाची आहे तो शिक्षण घेत असावा. 

2. रेकार्डसाठी प्रवेश पावती, मागील वर्षाचा निकाल, शिष्यवृत्ती घेत असल्यास त्याचा पुरावा व पासपोर्ट साइज फोटो असावा.

3. जे व्यक्ती आधीपासून समूहाचे सदस्य आहेत त्यांना प्राधान्य दिले जाईल ( नवीन जोडल्या गेलेल्या व्यक्तीला गरज असल्यास ते सुद्धा बघितले जाईल.) 

4. 50% अॅडमीनची जोडल्या गेलेल्या व्यक्तीप्रती जबाबदारी राहील. 

5. मुलाखत प्रक्रियेद्वारे थोडक्यात व्यक्तीची माहिती घेता येईल. ( सर्व माहिगती गोपनीय/ गुप्त स्वरूपात असेल) 

6. विद्यार्थ्याची बौद्धिक, शारीरिक क्षमता ध्यानात घेतली जाईल.

7. मदत ही जमा झालेल्या रकमेवरून ठरवली जाईल. 

8. सर्व मदत करुनही जर पैसे शिल्लक राहिले तर त्या पैशातून इतर काही करता येईल का ते पाहिले जाईल. 

9. पालकांना कल्पना देण्यात येईल. 

 10. शेवटचा निर्णय कमिटीकडे असेल. बदल करण्याचे निर्णय सर्वस्वी कमिटीकडे असतील.


 

No comments:

Post a Comment

लोकवर्गणी...# एक हात मदतीचा

31/ 12/ 2023 🤝"हेल्पिंग हँड्स समूहामार्फत"गावामध्ये मदत गोळा करण्यात आली तर यामध्ये लहान शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व गावा...