दिनांक 21 मे रविवार रोजी सातारा येथील दीपलक्ष्मी पतसंस्था येथील हॉल मध्ये helping hands समूहाचा शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.समूहातील 12 वी पर्यंत chya विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले (वह्या,पुस्तके,पेन) त्याच बरोबर शैक्षणिक दत्तक योजने अंतर्गत एका विद्यार्थिनीला बॅग वह्या पेन याच वाटप केले.कार्यक्रमाला प्रा.अशोक तवर सर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.त्यांनी मुलांना समूहाच्या उन्नती बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला पालक सुद्धा उपस्थित होते.कार्यक्रमाला ४६ सदस्य उपस्थित होते.शैक्षणिक साहित्य वाटप या उपक्रमाअंतर्गत ३९ विद्यार्थ्यांना आपण मदत केली.कार्यक्रमाचे प्रक्षेपण फेसबुक वर केले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष पद प्रीती मोहिते helping Hands chya सदस्या यांनी भूषवले. शैक्षणिक साहित्य वाटपाचा आर्थिक तपशील राजश्री घोडके यांनी वाचला .सूत्र संचालन दळवी मॅम यांनी केले तर आभार रिंकल शिकारे यांनी मानले.
आर्थिक तपशील सोबत जोडला आहे.
No comments:
Post a Comment