Helping Hands कार्यक्रम अहवाल जानेवारी 2021 :
जुलै 2020 मध्ये " *Helping Hands"*हा समूह बनवण्यात आला. 24 जानेवारी 2021 मध्ये ठरल्याप्रमाणे शैक्षणिक मदतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. इतर कार्यक्रमांच्या तुलनेत हा कार्यक्रम थोड्या वेगळ्या पद्धतीने घेण्यात आला. यात आवश्यक तेवढ्याच बाबींना ध्यानात घेतले गेले. कार्यक्रम ऑफलाईन तसेच ऑनलाईन दोन्ही प्रकारे संपन्न झाला. कार्यक्रमाचे स्वरूप सर्व सदस्यांना समूहाविषयी माहिती सांगणे, समूहाचा मुख्य उद्देश सांगणे, सर्व सदस्यांचा परिचय जाणून घेणे व जमा केलेल्या शैक्षणिक मदतीचे वितरण योग्य व्यक्तींना करणे असे होते. नियोजित वेळेनुसार सगळा कार्यक्रम सुरळीत पार पडला. महत्त्वाच्या मुद्द्यांवर दृष्टिक्षेप टाकून कार्यक्रम घेण्यात आला.
समूहाची मूळ संकल्पना, समूहाचे उद्दिष्ट याबाबत माहिती सांगण्यात आली. त्यानंतर कमिटी मेंबर या नाते शिवानी बर्गे यांनी मनोगत व्यक्त केले तसेच समूहाचे महत्त्व सांगितले. सूत्रसंचालन मधुर भोसले यांनी केले. आपल्या समूहाच्या प्रमुख उद्देशाला ध्यानात घेऊन निवड करण्यात आलेल्या विद्यार्थींनींना शैक्षणिक मदत करण्यात आली. मुख्य कार्यक्रमाच्या उद्देशानुसार व्यक्ती निवडण्यात आल्या. त्यांना शैक्षणिक रक्कम देण्यात आली. यानंतर उपस्थित ऑनलाईन तसेच ऑफलाईन सर्वांची ओळख घेतली गेली. थोडक्यात मनोगत, समूहासाठी कार्य करण्याचे आश्वासन काही सदस्यांनी दिले. शेलार सरांनी समूहासंदर्भात मार्गदर्शन केले. साधारणपणे वर्षभरात नवीन सदस्य जोडणे, त्यांची समूहासाठी आवश्यक माहिती घेणे, गरजू व्यक्ती शोधणे व निवड करणे, रक्कम जमा करणे इत्यादी कामे करण्यात आली. सर्व सदस्यांनी समूहाविषयी सुंदर शब्दात प्रतिक्रिया दिल्या. समूहाचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमातील उपस्थित लोकांचे व संपूर्ण समूहाचे आभार प्राजक्ता सावंत यांनी मानले. सर्वांच्या सहकार्याने या कार्यक्रमास शोभा आली. यानंतर पुन्हा नवीन सदस्य जोडण्यास सुरूवात केली आहे . 2020 मध्ये जे सदस्य होते त्यांच्यापैकी इच्छुक व्यक्तींना आता कमिटी मेंबर्स करण्यात आले आहे म्हणजेच सध्या Helping HANDS चे दोन समूह आहेत ( 2020 व 2021 चा स्वतंत्र समूह तयार करण्यात आला आहे.) ी
_चार शब्द आभाराचे_:सर्वप्रथम आपण सर्वांनी विश्वास या तत्वाचे पालन करून सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे आभार. आर्थिक बाब ही महत्त्वाची आहे हे ध्यानात घेऊन त्याचा सदुपयोग हा एका व्यक्तीला घडविण्यासाठी व्हावा हे आपण सर्वांनी लक्षात घेऊन अर्थार्जन केले. हा समूह आपला समजून आपण सर्वांनी यासाठी वेळ दिला. वर्षभर मेंबर अॅड होत होते. मात्र समूहात अन्य कोणताच संदेश येत नसल्याने समूहाचे वातावरण चांगले ठेवण्यात आपण सर्वांनी मोलाची साथ दिली. आपल्या सर्वांचे शब्दसुमनांनी शतशः आभार 🙏 सदर कार्यक्रमात आपण उपस्थिती तर दाखवलीच याशिवाय या समूहाविषयी मनोगत ही व्यक्त केले. किमया पवार, सोपान भुजबळ, प्रियांका कांबळे, गणेश शेलार, प्राजक्ता सावंत आणि मयुरी कुलकर्णी आपण सर्वांनी समूहाविषयी अत्यंत सुंदर अशा शब्दांत समूहाविषयी स्नेह व्यक्त केले. समूह आपला दिलगीर आहे. यानंतरही अशीच साथ आपण सर्वांनी द्यावी. आपल्या काही अडचणी वा शंका असतील तर अॅडमीनशी संपर्क साधावा ही नम्र विनंती! 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी:

No comments:
Post a Comment