यादरम्यान समूह हा चांगल्या भावनेतून बनवला गेला असून बचतीची संकल्पना समजून घेणे व मदतीचा भाव निर्माण करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे हे सदस्यांच्या मनोगतातून व्यक्त झाले. अनिकेत नलावडे यांनी समूहाची संकल्पना खूप चांगली असून पैसे वायफळ घालवण्यापेक्षा त्याचा वापर चांगल्या कामासाठी व्हायला हवा असे सांगितले. शेलार सरांनी समूहासंदर्भात मनोगत व्यक्त केले. यामध्ये रक्कम बचत करून द्यावी व समूह सर्वांचा आहे तर त्याविषयी एका कुटुंबाची भावना असावी, आत्मियता असावी असे सुचवले. इतर सदस्यांना समूहाचा भाग बनल्यावर सामाजिक भावना रुजल्याचे मानसिक समाधान मिळाले. आपल्याला मदत मिळणे शक्य नव्हते परंतु इतरांना ती देता येत आहे ही खूप चांगली गोष्ट आहे असे सदस्यांनी मनोगतातून सांगितले. संजय कदम, ऋतिक वांगडे व किमया पवार यांनी ऑनलाईन माध्यमातून समुहाविषयी प्रांजळ मनोगत व्यक्त केले.
समूहाचे वार्षिक अहवाल वाचन शुभांगी दळवी मॅडम यांनी केले व शैक्षणिक मदत निवड केलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात आली. याचे स्वरूप हे रक्कम व बचत करण्यासाठी गल्ला असे आहे. रक्कम मिळालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. रक्कम घेणारे जे विद्यार्थी उपस्थित नव्हते त्यांचे मनोगत वाचून दाखवण्यात आले. समूहाविषयी कृतज्ञतेची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली व सोबत भविष्यात रक्कम परत करण्याची शाश्वती यावेळी त्यांनी दिली. उपस्थितांचे व देणाऱ्या हातांचे आभार प्रदर्शन रिंकल शिकारे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय सपकाळ व मयुरी खानविलकर यांनी केले. रक्कम जमा करण्याचे काम ॠतिक जाधव यांनी केले व यासाठी सहकार्य शेलार सरांनी केले. एकूण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वच कमिटी सदस्यांनी व समूहातील इतर सदस्यांनी सहकार्य केले.
समूहाचा उद्देश व बचतीतून पैसे देण्याची संकल्पना वारंवार स्पष्ट करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रम हा ऑनलाईन गुगल मीट, युट्यूब तसेच ऑफलाइन प्रकारे आयोजित केला गेला.
No comments:
Post a Comment