समूहाची नियमावली

समूहाची नियमावली

या समूहात गरजू व्यक्तीला (विद्यार्थी/ विद्यार्थिनी )
शैक्षणिक मदत व्हावी यासाठी खालील उद्दिष्टांनी समूहात जाॅईन व्हावे

1. हा समूह " *विश्वास* " या तत्वावर चालणार आहे. पूर्ण निवेदन वाचूनच समूहात यावे ही नम्र विनंती! 

2. '365 दिवस' याप्रमाणे दरदिवशी 1 रूपया जमा करावा. समूहाद्वारे एक गल्ला पुरविला जाईल( बचतीच्या दृष्टीने गल्ला करावा..गल्ला स्वतः केला तरी चालेल किंवा अॅडमीन गल्ला पुरवतील)

3.  जमा झालेली रक्कम एका गरजू व्यक्तीच्या शिक्षणासाठी असून तो आपल्या ग्रुपचा सदस्य असावा.

4.  रक्कम जमा करण्यासाठी फाऊंडर मेंबर्स मधून एक कमिटी निवडली आहे. गरजू व्यक्तीच्या शिक्षणाचा, गुणवत्तेचा विचार केला जाईल. आणि मग मदत पुरवली जाईल

5.  रक्कम ही ऑफलाईन देणे शक्य नसल्यास ऑनलाईन व्यवहाराने द्यावी. तत्पूर्वी आपली सविस्तर माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, फोटो, शिक्षण/ व्यवसाय इत्यादी मागवले जाईल.

6. रक्कम आपापल्या इच्छेनुसार जमा करावी यात कमीत कमी 365 पासून पुढे कितीही.

7. जमा झालेल्या रकमेवरून ठरवण्यात येईल की किती गरजूंना याचा लाभ घेता येईल. 24 जानेवारी ही मदतीची तारीख असेल. तत्पूर्वी रक्कम जमा करावी.

8. कमिटी मेंबर्स हे नवीन सदस्य जोडतील. 

9. गरजूंना जेवढी रक्कम देण्यात येईल त्याची नोंद करण्यात येईल. आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर गरजू पुन्हा तो निधी समूहाला देईल.

10. यात वैयक्तिक स्वार्थ कोणाचाच नसावा. परत मिळण्याच्या आशेने मदत नसावी. सर्व आर्थिक तपशील लिहून ठेवला जाईल आणि तो दरवर्षी ग्रुप वर सांगितला जाईल

11. समूह वाढवण्यासाठी फक्त विश्वासू लोकांना सर्व कल्पना देऊन मगच अॅड करायला सांगावे. कमिटी मेंबर्स म्हणजे इतर लोक जोडणारे अॅडमीन असतील. नवीन सदस्य जोडणाऱ्या अॅडमीनची त्या सदस्यांप्रती जबाबदारी राहिल.

 12. व्हॉट्सऍप ग्रुप मध्ये राहणे सक्तीचे नाही. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही समूहात राहू शकता किंवा नाही हा निर्णय सर्वस्वी तुमचा असेल.

13 .जे व्यक्ती व्हाट्सअप वापरत नाहीत ते सुद्धा समूहाचे सदस्य होऊ शकतात त्यामध्ये आपल्या नातेवाईकांचा ,कुटुंबाचा ऑफलाइन सदस्य म्हणून विचार केला जाईल. त्याची नोंद घेतली.जाईल तसेच त्यांना समूहातील सूचना वगैरे सांगितल्या जातील.

 14. मुलांचा व मुलींचा समूह वेगळा असेल.

 15. नवीन सदस्यांकडून आलेल्या सूचनांचा मासिक कमिटी बैठकीत विचार करून त्यावर निर्णय घेतला जाईल.

16. साल 2023 पासून आपण एक नवीन उपक्रम सुरू करत आहोत. या उपक्रमानुसार आपण अनाथ विद्यार्थी/ विद्यार्थिनी दत्तक घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्च समूहातून करणार आहोत. 


वरील सर्व  अटी व नियम मान्य असतील तर ग्रुपमध्ये यावे..
🙏🤝

No comments:

Post a Comment

लोकवर्गणी...# एक हात मदतीचा

31/ 12/ 2023 🤝"हेल्पिंग हँड्स समूहामार्फत"गावामध्ये मदत गोळा करण्यात आली तर यामध्ये लहान शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व गावा...